रविवार, २९ मे, २०१६

निलंगा:-

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत  सिंदीजवळगा ता. निलंगा येथील जयहिंद विद्यालयाचा निकाल    टक्के लागला आहे. विद्यालयातील टक्के गुण घेऊन केंद्रात दुसरा तर विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळवला. तसेच टक्के गुण घेवून शाळेतून द्वितीय व टक्के गुण घेवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.. याबरोबरच टक्के तर टक्के गुण मिळवले आहेत. विद्यालयातून विशेष प्राविण्यासह  प्रथम श्रेणीत व द्वितीय श्रेणीतविद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेने उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली असून यशस्वी विद्यार्थ्यांचे आभिनंदन संस्थेचे संस्थापक सचिव लांडगे गुरुजी कार्याध्यक्ष वसंतराव पाटील, मुख्याध्यापक देविदास कोरे, पालक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.





शनिवार, १४ मे, २०१६

क्रिकेट सारख्या खेळातून समंजस व सांघिक भावना विकसित होते - देविदास कोरे

निलंगा:

शालेय जीवनात खेळाला अनन्य साधारण महत्व असून क्रिकेट सारख्या खेळातून विद्यार्थ्यांमध्ये खिलाडू वृत्ती बरोबरच समंजस व सांघिक भावनेचा विकास होण्यास मदत होऊ शकते असे मत मुख्याध्यापक देविदास कोरे यांनी व्यक्त केले. सिंदीजवळगा ता. निलंगा येथील जयहिंद विद्यालयाच्या भव्य क्रीडामैदानावर निलंगा तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन ता. नऊ मंगळवार रोजी सकाळी ठीक अकरा वाजता मुख्याध्यापक देविदास कोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आयोजित कार्यक्रमात तालुक्यातील विविध शाळातून क्रिकेट स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या खेळाडूंना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून रामेगावचे माजी चेअरमन शिवाजी शेळके, सुरेश धुमाळ, सी. व्ही. चव्हाण, एस. व्ही. शिंदे, एन. ए. सय्यद, आर. पी. तेलंग, जी. जी. जाधव, राहूल क्षीरसागर, एस. व्ही. तारे आदी आदी उपस्थित होते. 
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात तालूका क्रीडा संयोजक एस. व्ही. शिंदे यांनी निलंगा तालुकास्तरीय शालेय क्रिकेट व मैदानी स्पर्धेचे ठिकाण जयहिंद विद्यालय हे असल्याचे सांगून १६ व १९ वर्षे वयोगटातील शालेय क्रिकेट स्पर्धा अनुक्रमे ता. दहा व अकरा सप्टेंबर तर मैदानी स्पर्धा २२ व २३ सप्टेंबरला होणार असल्याची माहिती दिली व तालुक्यातील जास्तीत जास्त शाळांनी या स्पर्धांत सहभागी होण्याचे आव्हान केले. 
आज पार पडलेल्या १४ वर्षे वयोगटातील शालेय क्रिकेट स्पर्धेत जेवरी येथील जि. प. प्रा. शाळा, निलंगा येथील शिवाजी विद्यालय, प्रतिभाताई पवार आश्रम शाळा, सिंदीजवळगा येथील जयहिंद विद्यालय, व जाजनुर येथील जि. प. प्रा. शाळाच्या संघांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धांसाठी पंच म्हणून एस. व्ही. तारे, एस. व्ही. शिंदे एम. टी. जाधव काम पहात असून स्पर्धा यशस्वीतेसाठी एस. बी. परिहार, एस. व्ही, पवार, एस, व्ही. तारे, आष्ठुरे सर परिश्रम घेत आहेत.

कॅप्शन जोडा